ध्वनिमुद्रण – FB – Live

पोस्ट:
म्हटलं, तुम्हाला जरा रत्नागिरीच्या पोस्टाच्या कार्यालयात माझ्या शब्दांतून फिरवून आणावं. हा स्वानुभव पोस्टाच्या कामकाजावर आधारित आहे. पूर्ण सत्य नाही त्यामुळे इथे कोणी पोस्टातलं असेल तर माझ्यावर शाब्दीक हल्ला करु नका .


कथा – पाश


श्रुतिका – अनाथ
बयोकाकू आणि बापूंची ही कथा. स्वत:च्या मुलांप्रमाणेच वाढवलेला पुतण्या जेव्हा, ’टाकायचं होतं अनाथाआश्रमात कुणी सांगितलं होतं आम्हाला सांभाळा म्हणून?’ हा प्रश्न विचारतो तेव्हा दोघांना स्वत:च्या कानावर विश्वास ठेवणं जड जातं. कुठे चुकलं, काय चुकलं याचा हिशोब मांडला जातो. हे कमी की काय म्हणून त्यांचा बंडखोर मुलगा माधव मध्ये पडतो आणि सुहास आणि निमामुळे झाकोळलेल्या आपल्या बालपणाची आठवण करुन देतो. आयुष्याच्या संध्याकाळी शांतपणे पल्याडच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली दोन आयुष्यं त्या झंझावतात कोसळतात की तग धरतात? कोण असतं अनाथ? बयोकाकू आणि बापू की निमा, सुहास की माधव…?
सहभाग – मोहना जोगळेकर, विरेन जोगळेकर, संदीप कुलकर्णी, पराग काळे, संजय कुलकर्णी, कश्मिरा वानखेडकर


कथाकथन – अध्यक्षीय भाषण:

आम्ही लेखिका आंतरजालीय साहित्य संमेलनात माझे कथाकथन याबद्दलचे विचार आणि अनुभवकथन.


शार्लट महाराष्ट्र मंडळाच्यातर्फे FB – Live अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही नुकताच केला.  राजेंन्द्र आणि मी दोघांनीही हलक्याफुलक्या कथा सादर केल्या आहेत. जरूर पाहा, ऐका.

माझी टेकसॅवी कुसुम ही कथा कालनिर्णय २०१९ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या कथेचं हे अभिवाचन.
https://www.facebook.com/CharlotteMarathiMandal/videos/491736161710920/


मराठी भाषा गौरव दिन – सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदारांशी मी मारलेल्या गप्पा.


कविता – स्वप्न


आकाशवाणीचे दिवस