२०१७ – २०१८ (ज्ये)

वर्ष: ऑगस्ट २०१७ ते जून २०१८

२०१७ ते २०१८ : वर्षभरात मुलं काय शिकली:

इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तींची ओळख:
स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, शिवाजीमहाराज.

भाषण/मुलाखत:
मी पाहिलेला भारत, मला कोण व्हायचं आहे असे अनेक विषय.
शब्दांवरुन गोष्ट तयार करुन सांगणे.
गोष्टीला शेवट सुचविणे.
एखाद्या विषयावर तयारी करुन एकमेकांची मुलाखत घेणे. (शिक्षक, नट, शिपाई, न्हावी, नृत्यांगना…)

व्याकरण:
नाम, सर्वनाम, काळ, ‌पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गगारचिन्ह, प्रश्नचिन्ह, र्‍हस्व – दीर्घ, रफार नियम, मुळ शब्द आणि सामान्यरुप होताना त्याचं बदलणारं रुप,
एकाक्षरी इकारान्त किंवा उकारान्त शब्द दीर्घ असतात. उदा. ही, मी, धू, तू.
अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाचं अनेकवचन एकारान्त होते. घर – घरे, पान – पाने, दार – दारे.
मराठी शब्दांतील अकरान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. उदा. खीर, मूल, गरीब नीट. पण, तत्सम (संस्कृत) शब्दांतील अकरान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्वच राहतात.
उदा. गुण, दिवा, मंदिर, हिम, बुध.
वर्णमालेत नव्याने आलेल्या ’अॲ आणि ऑ’ ची ओळख.
स्वर आणि स्वरादीतील फरक (स्वर अ ते औ. अं आणि अ: हे स्वरादी आहेत).
अनुस्वार आणि विसर्ग ओळख (अं – अ वर असलेलं टिंब हा अनुस्वार आहे. तर अ: – : याल विसर्ग म्हणतात).
व्याकरणाचा नियम ऐकणे आणि त्यावरुन शब्द सांगणे. उदा. आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते. हा नियम मुलांना सांगितल्यावर त्यांनी तो नियम लागू होत असेलेले शब्द सांगणे.

वाचन, लेखन, कृती:
पुस्तकातील धडा वाचून दाखविणे. लिहिणे.
एकाच शब्दांचे होणारे वेगळे अर्थ आणि त्यावरुन प्रवेश तयार करुन सादर करणे.
गाळलेल्या जागा भरुन वाक्य पूर्ण करणे. उदा. … झोप येते. …. मी लवकर …
म्हणी आणि अर्थ. उदा. उथळ पाण्याला खळखळाट फार, आरोग्य हेच ऐश्वर्य आणि चकाकते ते सारेच सोने नसते.
मराठी बोलताना येणारे इंग्रजी शब्द आणि त्याला पर्याय. उदा. अडचण, समस्या, प्रश्न, कठीण या शब्दांचा वापर problem म्हणण्याऐवजी कसा करु शकतो. परिस्थितीप्रमाणे शब्दांचा उपयोग.
समान आणि विरुद्ध अर्थी शब्दांची ओळख.
मराठी महिने आणि दिशांची ओळख.
नवीन शब्दांची ओळख आणि त्याचा वापर.
लिहिलेल्या शब्दांत काय चुकलं आहे ते सांगून बरोबर करणे.

गोष्टी:
बदकाची हुशारी, राजूची आई, भुयार, धाडस.

खेळ:
लगोरी, खो-खो, कबड्डी, पत्ते, लपाछपी.