सप्टेंबर (ज्ये)

२४ सप्टेंबर २०१७

व्याकरणाचा नियम ऐकणे आणि त्यावरुन शब्द सांगणे. उदा. आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते. हा नियम मुलांना सांगितल्यावर त्यांनी तो नियला लागू होत असेलेले शब्द सांगणे.
फळ्यावरच्या शब्दांचा अर्थ सांगून ते शब्द लिहिणे.
पुस्तकातील छोटा धडा वाचून दाखविणे.
गोष्ट ऐकणे.

१७ सप्टेंबर २०१७

एकाच शब्दांचे होणारे वेगळे अर्थ आणि त्यावरुन प्रवेश तयार करुन सादर करणे – शब्द – रंग आणि पडणे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आत्तापर्यंत ऐकलेली माहिती सांगणे.
सावरकरांबद्दलचा पुढचा धडा ऐकणे. त्यातील शब्दांचे अर्थ.
लेखन, वाचन

१० सप्टेंबर २०१७

फळ्यावर लिहिलेल्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ सांगणे.
समर्थन आणि कृती या शब्दावरुन प्रवेश करणे. (छोटा गट)
चक्रिवादळ, हिमवर्षाव, समर्थन, कृती या सर्व शब्दांचा वापर करुन प्रवेश सादर करणे.
आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जितकं आठवत असेल ते सांगणे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची माहीती ऐकणे.