मार्च (ज्ये)

१८ मार्च २०१८

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल प्रत्येकाने माहिती सांगणे.
व्याकरण.
शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म – ऐकलेल्या माहितीवरुन प्रवेश सादर करणे.
इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ सांगणे, लिहिणे.

११ मार्च २०१८

छोटा गट – पुस्तकातलं जे वाचता येतं ते लिहिणे आणि वाचून दाखविणे.
कळकळ, ओंडका, पूर, झटका, पुडा हे नविन शब्द. त्यावरुन दोन्ही गटांनी प्रवेश सादर करणे.
सावित्रीबाई फुले आणि अरुणिमा सिन्हा या कर्तृत्ववान महिलांबद्दल माहिती.

४ मार्च २०१८

सांगितलेले शब्द लिहिणे. अर्थ सांगणे – तंत्रज्ञ, प्रदूषण, हवा, हवामान.

व्याकरण – पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गगारचिन्ह, प्रश्नचिन्ह याचा अर्थ सांगणे.

बदकाची हुशारी गोष्ट आणि त्यातील शब्द – मेजवानी, पाककृती, चविष्ट, स्वयंपाक, स्वयं – पाक.

एक बदक राजकन्येबरोबर अभ्यास करायला लागतं. वाचायला लिहायला शिकतं. इतर बदकं त्याची चेष्टा करतात. पण बदक दुर्लक्ष करतं. एकदा राजा मेजवानीचा बेत आखतो. राजवाड्यातील स्वयंपाकी बदकाला भाजायचं ठरवतो. पण लिहिता वाचता येणारं बदक त्याचा बेत चलाखीने बदलायला लावतं.

तात्पर्य – केलेला अभ्यास उपयोगी पडतो.