डिसेंबर (ज्ये)

३१ डिसेंबर २०१७

सुटीत काय केलं ते सांगणे.
राजूची आई गोष्टीतील उतारा वाचणे, लिहिणे.
पत्ते – चॅलेंज खेळ. प्रत्येक पत्त्याचा उल्लेख मराठीत करुन खेळ खेळणे.
शब्द होते – जठर, रमतगमत, बदल, दडपण, गडबड, मरगळ.
मुलांनी सांगितलेली गोष्ट:
एका माणसाच्या जीवनात खूप गडबड चालली आहे. त्याला मित्रांमुळे खूप दडपण येत आहे. त्याला बदल हवा आहे. पण त्याला मरगळ आली आहे. त्यामुळे त्याला बदलायचं नाही. त्याचं पोट दुखायला लागलं. तो दवाखान्यात गेला. वैद्याने त्याला औषध दिलं. तो रमतगमत घरी आला.

यात काळाचा गोंधळ झाला आहे तसंच पहिला उतारा आणि दुसरा यात काही संबंध नाही. पुढच्यावेळेस यामध्ये मुलांनी बदल करुन पुन्हा गोष्ट सांगणे.

१७ डिसेंबर २०१७

छोटा गट – काना – मात्रा विरहीत छोटं पुस्तक पूर्ण वाचणे.
मोठा गट – फळ्यावर लिहिलेला राजूची आई या गोष्टीतील दुसरा उतारा लिहिणे.
पहिला आणि दुसरा दोन्ही उतारे वाचून दाखविणे.
दोन्ही गट: या गोष्टीचा शेवट काय होईल याबद्दल प्रत्येकाने आपला अंदाज सांगणे.
समान अर्थी शब्द.
फळ्यावर लिहिलेल्या सर्व शब्दांचे अर्थ सांगणे.

 

 

 

 

 

 

 

 

उन्हाळ्याची सुट्टी होती. बागेत भेळवाले, फुगेवाले यांची झुंबड उडाली होती. मी बाकावर बसले. मीनू झोपाळ्यावर झोका घेत होती. तेवढ्यात एक बाई आल्या.
“राजू, अरे कुठे आहेस?” म्हणत त्या रडायला लागल्या. आम्ही सर्व मदतीला धावलो. राजू सापडला नाही. त्या बाई हताश झाल्या.

समानार्थी शब्द:
घर – आलय, सदन, भवन, गृह, निकेतन.
पाय – पद, पाद, चरण.
आकाश – गगन, आभाळ, नभ, अंबर.
आनंद – हर्ष, मोद, संतोष.
आई – माता, माय, माऊली, जननी.

१० डिसेंबर २०१७

छोटा गट – फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचे अर्थ सांगणे. ते शब्द वापरुन प्रवेश सादर करणे. प्रवेश सादर करताना चुकलेली वाक्य मोठ्या गटाने सुधारणे. पुन्हा तोच प्रवेश चुका सुधारुन करणे.
मोठा गट – फळ्यावर लिहिलेला गोष्टीतील उतारा वाचणे. लिहिणे. पुन्हा वाचणे.
दोन्ही गट – नवीन शब्दांची ओळख.
व्याकरण नियम.
मराठी शब्दांतील अकरान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात.
उदा. खीर, मूल, गरीब नीट.
पण, तत्सम (संस्कृत) शब्दांतील अकरान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्वच राहतात.
उदा. गुण, दिवा, मंदिर, हिम, बुध.

३ डिसेंबर २०१७

प्रत्येकाने दिलेल्या मासिकातील एक उतारा वाचणे. सर्वात जास्त आवडलेल्या उतार्‍याची गोष्ट, पुढील काही आठवड्यात वाचून लिहून पूर्ण करायची आहे – (मोठा गट).
पुस्तकातील धडा वाचून दाखविणे, गोष्ट सांगणे – (छोटा गट).

व्याकरण नियम:

  • मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात पण तत्सम (संस्कृत) शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्वच राहतात.
    उदा. मराठी शब्द – खीर, गरीब, बहीण, मूल. तत्सम (संस्कृत) शब्द – गुण, मंदिर, सुख
  • वर्णमालेत नव्याने आलेल्या ’ॲ आणि ऑ’ ची ओळख.
  • स्वर आणि स्वरादीतील फरक (स्वर अ ते औ. अं आणि अ: हे स्वरादी आहेत).
  • अनुस्वार आणि विसर्ग ओळख (अं – अ वर असलेलं टिंब हा अनुस्वार आहे. तर अ: – : याल विसर्ग म्हणतात).