६ ते ७ वेळ २०१८ – २०१९

सप्टेंबर २०१९

८ सप्टेंबर
शब्दलेखन.
नजर या शब्दाचा वेगवेगळ्या वाक्यात वापर आणि बदलणारा अर्थ.
एकवचन, अनेकवचन आणि लिंग – ते पान, ती पानं, तो कागद, ते कागद, ती नजर, त्या नजरा, तो दगड, ते दगड, तो चमचा, ते चमचे.

१५सप्टेंबर
शाळेतलं भूत गोष्ट.
थंड, गंध, मंद, आनंद, संथ हे शब्द न बघता लिहिणे.
कासवाच्या कवचाची गोष्ट आणि त्यातील शब्दांचा अर्थ.


मे २०१९

५ मे २०१९
विसर्ग (:) असलेले शब्द कसे लिहिले जातात आणि विसर्गचा वापर कसा केला जातो. उदा. स्वत:, मन:स्थिती, दु:ख इत्यादी.
फळ्यावर लिहिलेले शब्द वाचून दाखविणे – पर्याय, आयुष्य, संस्कृत इत्यादी.
कार्यक्रम सराव.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


 

एप्रिल २०१९

२८ एप्रिल २०१९
होळीबद्दलच्या निरनिराळ्या कथा.
ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा, राष्ट्र, राष्ट्रीयत्व हे फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे, लिहिणे.
उड्या मारणे सर्व सर्वानामांचा वापर करुन प्रत्येकाने वाक्यात उपयोग करुन दाखविणे.
रस्ता, तो, अचानक या शब्दांचा वापर करुन प्रत्येकाने गोष्ट सांगणे.

२१ एप्रिल २०१९
घे, दे, ये, जा, घे, आण या आज्ञार्थी शब्दांचा योग्य़ वापर करुन मोकळ्या जागा भरणे.
हे पैसे….
बाजारात…
पैसे मोजून…
उरलेले पैसे परत…
घरी लवकर परत…
प्रत्येकाने मराठीत तीन वाक्य लिहिणे आणि वाचून दाखविणे.
सावित्रीबाई फुले धडा आणि त्यावर प्रश्नोत्तरे.

७ एप्रिल २०१९
गुढीपाडव्याची माहिती. त्यासंदर्भातील वेगवेगळ्या कथा.
पर्वा/परवा फळ्यावर लिहून फरक सांगणे.
महाराष्ट्र हा शब्द फळ्यावर लिहून अर्थ सांगणे.
गोष्टी वाचणे, प्रवेश सादर करणे.
क्रियापदांचा वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात वापर करणे. उदा.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


मार्च २०१९

३१ मार्च २०१९
लपाछपी. राज्य असणार्‍याने १ ते ५० आकडे म्हणणे. खेळताना बोललेल्या प्रत्येक इंग्रजी वाक्याचं भाषांतर करणे.
कार्यक्रम तयारी:
ऐकलेल्या गाण्याचा अर्थ सांगणे. त्यावरुन प्रवेश करणे.
वाचून दाखविलेल्या दोन गोष्टींवर प्रवेश सादर करणे.
नाटिका सराव.

२४ मार्च २०१९
फळ्यावर लिहिलेल्या वाक्यांचं भाषांतर करुन सांगणे.
we all are samart. – आम्ही सगळे हुशार आहोत.
I am happy – मी आनंदी/खूष आहे.
I am sad – मी दु:खी आहे.
I feel happy – मला आनंद वाटतो.
I feel sad – मला वाईट वाटतं.
सांगितलेले शब्द लिहिणे.
आनंदी, पंखा
आजोबांची गोष्ट.
शब्द खेळ.
प्रवेश सराव.

१७ मार्च २०१९
श आणि ष चा वापर कसा करायचा त्याबद्दल उजळणी आणि सराव.
बी, सुरी, कात्री या शब्दांचं अनेकवचन सांगणे – बिया, सुर्‍या, कात्र्या. यावरुन व्याकरणाचा नियम सांगणे.
इकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचं अनेकवचन याकारान्त होते.
मी, ही, ती यावरुन व्याकरणाचा नियम सांगणे.
इकारान्त एकाक्षरी शब्द दीर्घ असतात.
तू, धू, पू यावरुन व्याकरणाचा नियम सांगणे.
उकारान्त एकाक्षरी शब्द दीर्घ असतात.
प्रवेश सराव.

१० मार्च २०१९
व्याकरण, शब्द, ‌र्‍हस्व, दीर्घ हे फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे, लिहिणे.
एका विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रसंग करायला सांगणे. तो प्रसंग त्या विद्यार्थ्याने शब्दांतून उभा करायचा आणि इतरांनी तो प्रसंग काय असेल ते ओळखणे हा खेळ. उदा. वस्तू हरवली आहे. ती कुणीतरी शोधतंय किंवा भिकारी भीक मागतोय. हे करताना हरवणे, भीक या शब्दांचा वापर न करता प्रसंग उभा करणे.
नाटिका सराव
कथा वाचन

३ मार्च २०१९
इंग्रजी शब्दाचं भाषांतर करुन फळ्यावर लिहिलेल्या शब्दांतून बरोबर कोणता ते ओळखून वहीत लिहिणे.
उदा. Tree – झाड आणि जाड असे दोन्ही शब्द फळ्यावर होते. काहींनी जाड असं लिहिलं. इतर शब्द – खाक, काख, नख, नक यात शुद्ध आणि अशुद्ध ओळखून लिहायचं.
फळ्यावर लिहिलेले शब्द वाचून व्याकरणाचे नियम सांगणे. उदा. मी, ही, तू, धू. काठी – काठ्या, वही – वह्या.
रफारचा वापर उजळणी. सांगितलेले शब्द फळ्यावर लिहिणे. शब्द – भ्रम, ग्रह, ट्रक, ड्रायव्हर, ग्रह, सूर्य, पूर्व, दर्‍या.
नाटिका, कथावाचन सराव.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


२४ फेब्रुवारी २०१९
इंग्रजीत फळ्यावर लिहिलेले चुकीचे आणि बरोबर शब्द ओळखणे.
जसं – आमी/ आम्ही, माला/मला. जेवा/जेव्हा यातील फरक सांगणे.
we like to read आणि Don’t disturb me या वाक्यांचं भाषांतर करुन वहीत लिहिणे.
कथावाचन सराव.
प्रवेश सराव.

१७ फेब्रुवारी २०१९ 
इंग्रजीत लिहिलेली वाक्य वहित मराठीत लिहिणे. उदा. I like river, I like rivers.
फळ्यावर शब्द लिहून दाखविणे – कागद, नदी इत्यादी.
मी, ही, ती, धू, पू हे शब्द दीर्घ का लिहितात त्याबद्दलचा व्याकरणाचा नियम सांगणे.
नदी – नद्या, काठी – काठ्या अशा शब्दांवरुन अनेकवचनाचा नियम सांगणे. वाक्यात उपयोग करणे.
वाचन.

१० फेब्रुवारी २०१९
शब्दातील ’दंडा’ ची ओळख. उदा. द मध्ये शीर्ष दंड आहे तर क मध्ये उभा दंड.
वाक्याक्षरी. एकवचन वापरुन एका वाक्याने सुरुवात, पुढच्याने त्याच शब्दाचं अनेकवचन वापरुन वाक्य सांगणे. यामधून मुलांना वाक्यात विशेषण बदललं की कसे बदल होतात याची ओळख.
ॲ आणि ऑ चा वापर – मॅच, हॅट, टॉप, टॉप नॉच इत्यादी शब्द. ॲ आणि ऑ चा समावेश नविन अभ्यासक्रमात आपण इंग्रजी शब्द वापरतो म्हणून करण्यात आलेला आहे. म्हणून मुद्दाम तसेच शब्द उदा. म्हणून वापरले.

३ फेब्रुवारी २०१९
ष अक्षराचा वापर केव्हा केला जातो.
ट, ठ, ड, ढ, ण हे अक्षर जेव्हा शब्दाच्या शेवटी येते तेव्हा पोटफोड्या ’ष’ चा वापर होतो.
उदा. कष्ट, नष्ट, उष्ट, पृष्ठ, उष्ण इत्यादी.
फळ्यावर लिहिलेल्या शब्दांवरुन दोन गटानी वेगवेगळी गोष्ट तयार करणे. सांगणे.
नाटिकेचं वाचन.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


जानेवारी २०१९

२७ जानेवारी २०१८
खोलीतल्या ३ गोष्टींवर ६ मराठी वाक्य तयार करणे.
व्याकरण नियम – कोणत्याही जोडशब्दांमध्ये ट, ठ, ड, ढ, ण येत असेल तर त्याआधी पोटफोड्या ष वापरला जातो. उदा.
कष्ट, स्पष्ट, पृष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ, कृष्ण.
फळ्यावर सांगितलेले शब्द लिहिणे.
नाटिका आणि कथावाचन.

२० जानेवारी २०१९
संगीतखुर्ची खेळ – अगोबाई ढगोबाई आणि गवताचं पातं गाणं.
शब्दाक्षरी
दर्प, ट्रम्प, राष्ट्र, राष्ट्राध्यक्ष असे ’र’ प्रकारचे शब्द लिहिणे.
२५ ते ५० आकडे.
नाटिका वाचन.
कथेतील एका पानाचं वाचन.

१३ जानेवारी २०१९
नकाशा या शब्दाचा वापर करुन नाटिका करणे.
पुस्तकातील उतारा वाचणे.
’र’ च्या नियमांची उजळणी.

६ जानेवारी २०१९
कर्म, धर्म, सर्व, क्रम, प्रत या ’र’ ची पुन्हा उजळणी. सांगितलेले शब्द मुलांनी फळ्यावर लिहून दाखवणे.
मोठा गट – गोष्टीतील एक पान वाचून दाखविणे.
छोटा गट – वर्षअखेरीला करण्याच्या नाटीकेचं वाचन.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


डिसेंबर २०१८

३० डिसेंबर २०१८
र् या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती. आणि पोटफोड्या ’ष’ जोडाक्षरात केव्हा वापरला जातो. या सर्वांचा वापर करुन फळ्यावर शब्द लिहून दाखविणे.
ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनांआधी जोडाक्षरात पोटफोड्या ’ष’ वापरला जातो. जसं कष्ट, पृष्ठ, कृष्ण.

‘र’फार प्रकार १
उभी रेघ असलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देतात. उदा. – प हे व्यंजन. जेव्हा प्रकार लिहितो तेव्हा प या व्यंजनाचं रुपांतर ’प्र’, भ्रमण

‘र’फार प्रकार २
उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा – ट्रक, ट्रेक.

‘र’फार प्रकार ३
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना आधीच्या अक्षरावर जोर येत नसेल तर पुढीलप्रमाणे लिहिलं जातं. उदा. सुऱ्या, दुसऱ्या, वर्‍हाड,

‘र’फार प्रकार ४
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना आधीच्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावर रफार काढतात. उदा.: कर्म, तर्क.

१६ डिसेंबर २०१८
अपघात या शब्दावरुन एकेक वाक्य सांगत गोष्ट तयार करणे. फळ्यावर लिहिलेली गोष्ट प्रत्येकाने वाचून दाखवणे.
फळ्यावर लिहिलेली इंग्रजी वाक्य मराठीत वहीत लिहिणे.
नविन शब्द आणि उजळणी – वन्य जीवन, चिंता, दडपण, ताण, काव्य, कविता, लेखक, लेखिका, रुचकर, घोषणा, सामना, संघ, गडद, फिकट, तर्क, तर्कशास्त्र.
गांधीजी पुस्तक वाचत असल्याने नुकताच घानामध्ये त्यांचा असलेला पुतळा काढला गेला त्याबद्दल माहिती.

९ डिसेंबर २०१८
वन्यजीवन, अपघात, हिमवर्षाव, निसरडा, हिम, वर्षा या शब्दांचे अर्थ.
अपघात, वन्यजीवन या शब्दावरुन गोष्ट तयार करणे. त्यातील दोन वाक्य लिहिणे. वाचून दाखवणे.
लपाछपी.

२ डिसेंबर २०१८
घर या शब्दाचे समानअर्थी शब्द लिहिणे, वाचणे – भवन, आलय, सदन, भवन, निवास, गृह.
गांधीजी पुस्तकातील पुढचा धडा.
खोटं का बोलावं आणि का बोलू नये दोन्ही बाजू मांडणे.
रुचकर, चविष्ट, निदर्शन, लेखक, लेखिका, चिंता, दडपण, ताण, गुळगुळीत, बुळबुळीत, घोषणा, हरकत, गडद, फिकट, पूर, ओंडका, कळकळ, सुखरुप या शब्दांची उजळणी.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


नोव्हेंबर २०१८

११ नोव्हेंबर २०१८
गांधीजी पुस्तकातील पुढचा धडा.
मोठा गट – सजाण गोष्टीतील पुढचं पान वाचन.
छोटा गट – पुस्तकातील एक उतारा वाचन.
वर्षअखेर करायच्या कार्यक्रमाबद्दल मुलांनी सुचविलेल्या कल्पनांवर चर्चा.

४ नोव्हेंबर २०१८
दिवाळीच्या ५ दिवसांची माहीती.
मोठा गट – सजाण कथेतील पूर्ण एका पानाचं वाचन.
छोटा गट – पुस्तकातील एका पानाचं वाचन.
दिवाळीच्या ५ दिवसांची माहीती.
मोठा गट – सजाण कथेतील पूर्ण एका पानाचं वाचन.
छोटा गट – पुस्तकातील एका पानाचं वाचन.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


ऑक्टोबर २०१८

२८ ऑक्टोबर २०१८
गाठ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि त्याचा उपयोग प्रवेशातून करुन दाखविणे.
गोष्टीतील उतारा वाचून दाखविणे. 

२१ ऑक्टोबर २०१८
‘प’ या अक्षरावरुन पूर्ण भूतकाळात वाक्य सांगणे स्पर्धा.
काळ आणि अपूर्ण काळांची ओळख.
महात्मा गांधींबद्दलचा पुढील धडा.
शब्दलेखन – दडपण, चिंता, घोषणा, धाडस, सामना, नकाशा

१४ऑक्टोबर २०१८
महात्मा गांधी पुस्तकातील २ धडे.
व्याकरण.
दिलेल्या शब्दांवरुन प्रवेश.
शब्दसंग्रह – आधी शिकलेल्या शब्दांची उजळणी.
नवीन शब्द – मुद्दा, उन्हाळी शिबीर, गुणवान, गुणवत्ता, धाडस, घोषणा.
लपाछपी आणि १०० पर्यंत आकडे.

७ ऑक्टोबर २०१८
मोठा गट – गोष्टीतील उतारा वाचून दाखविणे.
छोटा गट – कानामात्रा विरहीत पुस्तकातील ज्या शब्दांचा अर्थ ठाऊक आहे ते लिहिणे.
महात्मा गांधीबद्दल गोष्टीरुपाने माहिती.
शब्दसंग्रह – गुळगुळीत, बुळबुळीत, लाजाळू, लेखक, लेखिका, लेख, कवी, कविता, पौष्टीक, रुचकर,  या शब्दांची ओळख.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी


सप्टेंबर २०१८

३० सप्टेंबर २०१८
व्याकरण – सर्वनाम व्याख्या आणि सर्वनामातील दर्शक सर्वनामांची ओळख – हा, ही, हे, ते, तो इत्यादी.
पुस्तकातील उतारा वाचणे.
लेखन.
लपाछपी.
चिंता, दडपण, गुळगुळीत, बुळबुळीत, काव्य, कविता, लेखक, लेख, गाभा, पौष्टिक, रुचकर, या शब्दांची ओळख, त्यांचे अर्थ.

२३ सप्टेंबर २०१८
व्याकरण – इकारान्त आणि उकारान्त एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घच लिहिले जातात. उदा. मी, ही, तू, धू
‘च’ या अक्षरापासून सुरु होणारे शब्द सांगण्याची दोन गटात स्पर्धा.
अळणी, महत्वाकांक्षी, धाडस, घोषणा, फटफटी, सामना या शब्दांची ओळख, त्यांचे अर्थ.
दोन गटाला दिलेल्या दोन गोष्टींचं लेखन आणि वाचन.

९ सप्टेंबर २०१८
गणपतीच्या दोन गोष्टी – प्रदक्षिणा, पुतळा
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला आणि त्याचं बदललेलं रुप याबद्दल माहिती.
सजाण या कथेतील पहिला उतारा वाचणे.
दोन गटात मुकाभिनय स्पर्धा. विरुद्ध गटाने मुकाभिनयाचं वाक्यात रुपांतर करणे.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी