२०१७ – २०१८ (म)

वर्ष: ऑगस्ट २०१७ ते जून २०१८

२०१७ ते २०१८ : वर्षभरात मुलं काय शिकली:

गोष्टी:
आईची थप्पड , घरभर प्रकाश , डास आणि मुर्ख मुलगा, दिनूचे बिल , घारीची चलाखी .

कविता/गाणी:
हातापाय, संगत, स्वयंपाक, गंमत, असे कसे?

खेळ:
सागरगोटे , पत्ते – चॅलेंज. मराठीत पत्यांची ओळख, लगोरी, कबड्डी.
मुकाभिनय – इतरांनी ओळखून वाक्य तयार करणे.
लपविलेल्या गोष्टी शोधणे –  त्या गोष्टींचे अनेकवचन सांगणे आणि दोन गटांनी या शब्दांचा वापर करुन प्रवेश सादर करणे.
चिठ्ठीतील शब्द वाचणे, लिहिणे व त्यावरुन प्रवेश सादर करणे.
दोन गटात स्पर्धा – इंग्रजी पुस्तकातील गोष्ट मराठीतून सादर करणे. दुसर्‍या गटाने वाक्यात काय चुकलं ते सांगणे.

अभ्यास:
सर्वनामांचा वापर करुन वाक्य. उदा. धावणे हा शब्द. + वाक्य पूर्ण करणे. उदा. आई मोठ्याने….. (बोलते, ओरडते, गाते इत्यादी).दादा माझ्याबरोबर… (खेळतो, भांडतो, अभ्यास करतो इत्यादी)
दाखविलेले अवयव ओळखणे – उदा. भुवई, पापणी, पाऊल, तळपाय.
चित्रातील दिनक्रम वर्तमानकाळात आणि भूतकाळात सांगणे. चित्रावरुन गोष्ट तयार करणे.
चवींची ओळख. पदार्थ आणि त्या पदार्थांची नावं – जसं – salt म्हणजे – मीठ – मिठाची चव – खारट. तसंच त्या त्या पदार्थाचं लिंग – साखर – ती साखर…
आकडे, वाराचं गाणं, स्वयंपाक गाणं, अवयव गाणं.
कालनिर्णय ( दिनदर्शिका) आणि मराठी महिने ओळख.
शब्दांचे वाक्यात उपयोग करताना होणारे बदल सांगणे. (सामान्यरुप – उदा. जीभ – जिभेला, मूल – मुलांना इत्यादी.)
लिंगभेदामुळे होणारे बदल शिकणे/वाक्यात वापरणे.
एकाच वाक्याचा उपयोग वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात करणे.
शब्दांचा वापर करुन तिन्ही काळात वाक्य तयार करणे. शब्दांचं सामान्यरुप सांगणे. जसं – खाणे – खायला, खाताना.
फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे, अर्थ सांगणे, जे शब्द वाचता आले ते वहीत लिहिणे. त्या शब्दांचा वापर करुन वाक्य तयार करणे.
फळ्यावरची चित्र ओळखणे.
प्रत्येकाने एक मिनिटं काहीही बोलणे.
उच्चार आणि शब्दातील फरक – जसं मुलं म्हणताना घर हा शब्द नकळत गर उच्चारतात. पाऊस ला पौस म्हणतात. फळ्यावर ते शब्द लिहून कुठला बरोबर ते मुलांनी सांगणे.