मार्च (म)

१८ मार्च २०१८

ओळख गुढीपाडवा सणाची.
घरभर प्रकाश या गोष्टीचं दोन्ही गटांनी सादरीकरण.
आईची थप्पड गोष्ट.
इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषांतर.
पुस्तकातील उतारा वाचणे (मोठा गट)
वाचन, लेखन.

११ मार्च २०१८

इंग्रजी शब्दांचे अर्थ सांगणे.
लपविलेल्या गोष्टी शोधणे – खडू, चेंडू, कागद, केस, कागद, रुमाल.
या शब्दांचे अनेकवचन सांगणे आणि दोन गटांनी या शब्दांचा वापर करुन प्रवेश सादर करणे.
गोष्ट – घरभर प्रकाश.

४ मार्च २०१८

घारीची चलाखी गोष्ट :
कावळ्याला बदाम सापडतो. कठीण कवचामुळे त्याला तो फोडता येत नाही. घार त्याला झाडावरुन बदाम खाली टाकण्याचा सल्ला देते. कावळा तिचं ऐकतो आणि घार कावळ्याने खाली टाकलेला बदाम खाऊन निघून जाते.
तात्पर्य – सल्ला ऐकून घ्यावा, पण आपणही विचार करावा.

गोष्टीतील शब्द आणि अर्थ – शब्द – घार, बदाम, झाड, कवच, कावळा, झडप.

घारीच्या गोष्टीवरुन प्रवेश सादर करणे.

लपाछपी. ज्याच्यावर राज्य त्याने आकडे म्हणणे. खेळताना वापरल्या गेलेल्या वाक्यांचं मराठीत भाषांतर.

लेखन, वाचन.