जानेवारी (म)

२७ जानेवारी २०१८

चतुर बिरबल – काठीची गोष्ट आणि त्याचं सादरीकरण.
दिनूचे बिल कथा.
वाचन, लेखन.

दिनूचे बिल. 
दिनूचे वडिल वैद्य होते. दिनू त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तिथे खूप रोगी येत. कोणी म्हणे, ’माझं पोट दुखतंय.’ तर कोणी म्हणे, ’माझं बिल किती झालं ते सांगा.’
दिनू सर्व ऐकत असे. खूप गोष्टी त्याला कळायला लागल्या. पण बिल म्हणजे काय ते त्याला कळत नव्हतं.
“बाबा, बिल म्हणजे काय हो?” एकदा त्याने विचारलंच.
वैद्यांनी एक कागद दाखवला. कागदावर लिहिलेलं दिनू वाचायला लागला.
तपासणी – १० रुपये.
घरी येण्याबद्दल – २० रुपये
औषध – ८ रुपये.
एकून – ३८ रुपये.

दिनूने बिल वाचलं. त्याला एक कल्पना सुचली. दिनू घरी गेला. आईच्या नावे त्याने बिल तयार केलं.

बागेतून फुलं आणली – ५० पैसे.
बाळाला सांभाळलं – २ रुपये.
काकूंना निरोप दिला – १ रुपया.
साखर आणली – ५० पैसे.
बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवलं.

दुसर्‍या दिवशी दिनू सकाळी उठला. त्याच्या उशीपाशी ४ रुपये ठेवले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात आणखी एक कागद त्याला दिसला. दिनूच्या नावाने आईने बिल केलं होतं.
मोठा केल्याबद्दल – काही नाही.
आजारी असताना काळजी घेतल्याबद्दल – काही नाही.
गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल – काही नाही.
वाचायला शिकवल्याबद्दल – काही नाही.

दिनूला रडायला आलं. तो आईला बिलगला. आईचे पैसे त्याने परत केले.

२१ जानेवारी २०१८

प्रत्येक शब्द वर्तमानकाळात वापरणे.
उभं राहणे, एकटक पाहणे, आणणे, बांधणे, ठेवणे, माफ करणे…. (मी उभा राहतो/राहते)
गोष्ट सांगणे. मोटू उंदीर गोष्टीतील अर्धवट सांगितलेलं वाक्य पूर्ण करणे. (मोटू नावाचा…. मुलांनी उंदीर होता हे सांगणे. अशा पद्धतीने पूर्ण गोष्ट)
लिहिणे, वाचणे.

कविता

सोमवार म्हणजे Monday
मंगळवार म्हणजे Tuesday
आम्ही गिरवतो मराठीचे धडे!

Wednesday म्हणजे बुधवार
Thursday म्हणजे गुरुवार
काहीतरी पाहिजे गारेगार!

Friday म्हणजे शुक्रवार
Saturday म्हणजे शनिवार
आठवड्यात आहेत सात वार!

मोटू उंदीर गोष्ट 
मोटू नावाचा उंदीर होता. तो खट्याळ होता. सारखा बिळाबाहेर खेळायचा. आई त्याला सांगायची, “मोटू, मांजर तुला पकडेल. बाहेर खेळू नकोस.” मोटू म्हणायचा, “मी नाही लपून बसणार. मला खेळायला आवडतं.” एकदा तो सोनूच्या घरी गेला. सोनू आंघोळ करत होता. सोनू बाहेर आला. मोटू आत गेला. साबणाची बाटली मोटूने कुरतडली. सगळा फेस बाहेर आला. मोटूच्या अंगावर सांडला. काळा मोटू पांढरा झाला. सोनूने मोटूला पाहिलं. सोनू किंचाळला. मोटू पळाला. मोटू घरी आला. पण त्याला कुणी ओळखलं नाही. तो इकडे तिकडे फिरत राहिला. मांजराने त्याच्यावर झडप घातली. मोटू गटारात पडला. पाण्यात बुडाला. त्याची आंघोळ झाली. मोटू पुन्हा काळा झाला. तो घरी आला. सर्वांनी त्याला ओळखलं. मोटू आता आईचं ऐकतो. तो बिळातच राहतो.

१४ जानेवारी २०१८

सावित्रीबाई फुले गोष्ट ऐकणे.
१ ते ५० आकडे.
शब्दांचं सामान्यरुप सांगणे. जसं – खाणे – खायला, खाताना.
वाचन, लेखन.
चित्रातील मधली रेष (काना) ओळखणे. शब्द वाचणे.

मोटू उंदीर गोष्ट अंताक्षरी पद्धतीने पूर्ण करणे.
मोटू नावाचा उंदीर होता. तो खट्याळ होता. सारखा बिळाबाहेर खेळायचा. आई त्याला सांगायची, “मोटू, मांजर तुला पकडेल. बाहेर खेळू नकोस.” मोटू म्हणायचा, “मी नाही लपून बसणार. मला खेळायला आवडतं.” एकदा तो सोनूच्या घरी गेला. सोनू आंघोळ करत होता. सोनू बाहेर आला. मोटू आत गेला. साबणाची बाटली मोटूने कुरतडली. सगळा फेस बाहेर आला. मोटूच्या अंगावर सांडला. काळा मोटू पांढरा झाला. सोनूने मोटूला पाहिलं. सोनू किंचाळला. मोटू पळाला. मोटू घरी आला. पण त्याला कुणी ओळखलं नाही. तो इकडे तिकडे फिरत राहिला. मांजराने त्याच्यावर झडप घातली. मोटू गटारात पडला. पाण्यात बुडाला. त्याची आंघोळ झाली. मोटू पुन्हा काळा झाला. तो घरी आला. सर्वांनी त्याला ओळखलं. मोटू आता आईचं ऐकतो. तो बिळातच राहतो.

७ जानेवारी २०१८

लिहिता वाचता येणारा गट – शब्दकोडं. सांगितलेले इंग्रजी शब्द कोड्यातून शोधणे. लिहिणे. वाचणे.

खाणे, चालणे, पुसणे, धुणे, पाहणे, खेळणे या शब्दांवरुन गोष्ट तयार करणे.

गट १ ने केलेली गोष्ट – एक दिवस एक मुलगा उन्हातमध्ये चालत गेला. बाहेर खूप गरम आहे. मग त्याने त्येच घाम पुसला. तर त्याल एक नदी दिसलं. मी माझा हात धुतो. मग त्यानला तहान आणि भूक लागलं. मी माझा केळं खाईन आणि पाणी पिईन. तर त्याने खूष झाला. मग त्याने घरी गेला.

गट २ – (संवादात्मक) पूर्वी अनुष्का खूप टी. व्ही. बसून पाहत होती. ती कपडे नाय धूत आणि फोन नाय पुसते. पण आज ती फोन पाहते का? बाहेर जाते. टी. व्ही. पाहते का? मी कपडे धुते. तू मित्रासोबत खेळते. हो मी मैत्रिणींसोबत खेळते.
यातील चुका पुढच्या वेळेस सुधारुन पुन्हा सादर करणे.

 यात झालेल्या चुका दुसर्‍या गटाने सांगणे. याच गोष्टी सुधारुन सांगायच्या आहेत.