एप्रिल (म)

29 एप्रिल 2018

लगोरी खेळ. खेळताना वापरलेली सर्व इंग्रजी वाक्य मराठीत सांगणे.
क, ख, ग, घ, द, ड, र, म, न, भ, त ही अक्षरं लिहिणे. त्यातील अक्षरांचा वापर करुन
छोटा गट – इंग्रजीत सांगितलेले शब्द मराठीत लिहिणे. do, pulp, home – कर, गर, घर.
मोठा गट – गड, दड, घड, कडक, मन, तन, मत, ताक, मान, भात हे शब्द.
चित्रावरुन गोष्ट तयार करणे.

22 एप्रिल 2018

आई, बाई, ताई, कर, धर, जर, तर, घर, खाऊ, काख, ऊस, सण, आग हे फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे/लिहिणे.
कालनिर्णय ( दिनदर्शिका) आणि मराठी महिने ओळख.
छोटा गट – क, ख, ग, घ, र ही अक्षरं लिहिणे आणि do, pulp, home हे इंग्रजी शब्द मराठीत लिहिणे/वाचणे.
चित्रावरुन दोन गटानी गोष्ट तयार करणे. सांगणे, प्रवेश सादर करणे.

१५ एप्रिल २०१८

दोन गटात स्पर्धा – इंग्रजी पुस्तकातील दोन पानांवरुन मराठीत गोष्ट तयार करणे आणि ती प्रवेशातून सादर करणे. दुसर्‍या गटाने वाक्यात काय चुकलं ते सांगणे.
उच्चार आणि शब्दातील फरक – जसं मुलं म्हणताना घर हा शब्द नकळत गर उच्चारतात. पाऊस ला पौस म्हणतात. फळ्यावर ते शब्द लिहून कुठला बरोबर ते मुलांनी सांगणे.
इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषातंर. संपूर्ण भूतकाळ – जसं I went – मी गेलो/गेले, she ate – तिने खाल्लं. इत्यादी.

८ एप्रिल २०१८

धावण्याची शर्यत.
जिंकलेल्यांनी आलटून पालटून ट्रॅम्पोलिनवर खेळणे. उरलेल्यांनी १ ते ५० आकडे, रंग, वार, अवयव उजळणी
इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषांतर (त्यातून काळाची ओळख) जसं I was going, She was going, I go, She goes.इयत्ता, गणित, भूगोल, इतिहास इत्यादी शब्दांची ओळख.
गोष्ट – घरभर प्रकाश. त्यातील शब्द.
लेखन, वाचन.