५ ते ६ वेळ

११ मार्च २०१८

इंग्रजी शब्दांचे अर्थ सांगणे.
लपविलेल्या गोष्टी शोधणे – खडू, चेंडू, कागद, केस, कागद, रुमाल.
या शब्दांचे अनेकवचन सांगणे आणि दोन गटांनी या शब्दांचा वापर करुन प्रवेश सादर करणे.
गोष्ट – घरभर प्रकाश.

४ मार्च २०१८

घारीची चलाखी गोष्ट :
कावळ्याला बदाम सापडतो. कठीण कवचामुळे त्याला तो फोडता येत नाही. घार त्याला झाडावरुन बदाम खाली टाकण्याचा सल्ला देते. कावळा तिचं ऐकतो आणि घार कावळ्याने खाली टाकलेला बदाम खाऊन निघून जाते.
तात्पर्य – सल्ला ऐकून घ्यावा, पण आपणही विचार करावा.

गोष्टीतील शब्द आणि अर्थ – शब्द – घार, बदाम, झाड, कवच, कावळा, झडप.

घारीच्या गोष्टीवरुन प्रवेश सादर करणे.

लपाछपी. ज्याच्यावर राज्य त्याने आकडे म्हणणे. खेळताना वापरल्या गेलेल्या वाक्यांचं मराठीत भाषांतर.

लेखन, वाचन.

४ फेब्रुवारी २०१८

५ ते ६ वर्गातील मुलं काय शिकली:

मराठी वाक्यांचं इंग्रजी भाषांतर. तो/ती/ते/तू भारतात गेला आहे/स इत्यादी.  मी लहानपणी खेळत/रडत/ असे इत्यादी
(मुलांचा मराठी बोलताना काय गोंधळ होतो ते त्यामुळे लक्षात येतं.)
चिठ्ठीतील शब्द वाचणे, लिहिणे व त्यावरुन प्रवेश सादर करणे. – शब्द – अरबट – चरबट, भरभर, पटकन, कटकट असे बरेच.

२७ जानेवारी २०१८

चतुर बिरबल – काठीची गोष्ट आणि त्याचं सादरीकरण.
दिनूचे बिल कथा.
वाचन, लेखन.

दिनूचे बिल. 
दिनूचे वडिल वैद्य होते. दिनू त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तिथे खूप रोगी येत. कोणी म्हणे, ’माझं पोट दुखतंय.’ तर कोणी म्हणे, ’माझं बिल किती झालं ते सांगा.’
दिनू सर्व ऐकत असे. खूप गोष्टी त्याला कळायला लागल्या. पण बिल म्हणजे काय ते त्याला कळत नव्हतं.
“बाबा, बिल म्हणजे काय हो?” एकदा त्याने विचारलंच.
वैद्यांनी एक कागद दाखवला. कागदावर लिहिलेलं दिनू वाचायला लागला.
तपासणी – १० रुपये.
घरी येण्याबद्दल – २० रुपये
औषध – ८ रुपये.
एकून – ३८ रुपये.

दिनूने बिल वाचलं. त्याला एक कल्पना सुचली. दिनू घरी गेला. आईच्या नावे त्याने बिल तयार केलं.

बागेतून फुलं आणली – ५० पैसे.
बाळाला सांभाळलं – २ रुपये.
काकूंना निरोप दिला – १ रुपया.
साखर आणली – ५० पैसे.
बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवलं.

दुसर्‍या दिवशी दिनू सकाळी उठला. त्याच्या उशीपाशी ४ रुपये ठेवले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात आणखी एक कागद त्याला दिसला. दिनूच्या नावाने आईने बिल केलं होतं.
मोठा केल्याबद्दल – काही नाही.
आजारी असताना काळजी घेतल्याबद्दल – काही नाही.
गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल – काही नाही.
वाचायला शिकवल्याबद्दल – काही नाही.

दिनूला रडायला आलं. तो आईला बिलगला. आईचे पैसे त्याने परत केले.