५ ते ६ वेळ २०१८ – २०१९

जानेवारी २०२०

५ जानेवारी २०२०

Reya, suti, zop. Aanaya, rasta, kutra, mar. Aaroha, mitra, khel. Raghav, aai, dukan, kharedi. या वाक्यात ने, बरोबर, च्या, ला, ले, चा वापर करुन मराठीत पूर्ण वाक्य सांगणे.
ते दार – ती दारं/दारे, ते पुस्तक – ती पुस्तकं/पुस्तके, ते चित्र – चित्रं/चित्रे, ते पान – ती पाने. अशा शब्दांचं लिंग ओळखणे. एकवचन आणि अनेकवचन वापरुन वाक्य तयार करणे.
कौरव आणि पांडव, गुरुभक्त एकलव्य या गोष्टी. रामायण, महाभारत काय आहे याबद्दल थोडीशी माहिती. गोष्टींवरील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं देणे.
लेखन.


डिसेंबर २०१९

२९ डिसेंबर २०१९
योग्य जोड्या जुळवणे
दात – खा
दार – काढा
खाऊ – उघडा
कचरा – घासा
वाक्याचा प्रकार – आज्ञार्थी

चित्रावरुन वाक्य/गोष्ट सांगणे
मधुला सापडला फुगा. हिरवा, पिवळा फुगा. मधु हातात धरुन धावू लागला. वारा आला. फुगा हातातून सुटला. हवेत गेला. झाडावर अडकला. वानर आला. वानराने फुगा हातात धरुन दाबला. फुगा फुटला. वानर घाबरला. धूम पळाला. मधु खुदूखुदू हसला.

१५ डिसेंबर २०१९
१ ते २५ आकडे म्हणणे, लिहिणे
घड्याळ उजळणी – सव्वा, दीड, पावणे
मोठा गट – अकारान्त शब्द एकवचन व त्याचं अनेकवचन नियम. घर – घरे, दार – दारे इत्यादी.
गोष्ट वाचन – विचारलेल्या प्रश्नांना पूर्ण वाक्यात उत्तर देणे.
चालणे, चढणे, खोडणे, निवडणे, ठेवणे, धुणे, विसरणे हे शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग.
लेखन

८ डिसेंबर २०२९
घड्याळ उजळणी – सव्वा, साडे, पावणे शिकणं. उदा. सव्वा सहा, साडेसहा, पावणेसात…
सर्व वाक्य भूतकाळ आणि भविष्यकाळात ’आम्ही’ वापरुन सांगणे. उदा. आम्ही रडलो, आम्ही रडू.
पोहणे, हसणे, गाणे, नाचणे, धावणे, पळणे या क्रियापदांचा वापर.
गवताचं पातं वार्‍यावर डोलतं हे गाणं संगीतखुर्ची खेळत पाठ करणे. त्यातील शब्दांचा अर्थ.
वाचन, लेखन.

१ डिसेंबर २०१९
घड्याळ – सव्वा, साडे, पावणे शिकणं. उदा. सव्वा सहा, साडेसहा, पावणेसात…
इंग्रजी वाक्यांचं भाषांतर – उदा. – They are stupid, They are smart, They are tall, They are short…
नपुंसकलिंगी शब्द आणि त्यांचं एकवचन – ते घर – ती घरं, ते नाक – ती नाकं, ते दार – ती दारं, ते घड्याळ – ती घडयाळं, ते पेन – ती पेनं.
टिपूची गोष्ट भाग ३ – ४ – विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं.
वाचन, लेखन.


नोव्हेंबर २०१९

१७ नोव्हेंबर 
कागदावर लिहिलेले शब्द वाचणे. त्यावरुन गोष्ट तयार करणे.
घड्याळ – सव्वा, साडे, पावणेची ओळख.
टिपू गोष्टीतील काही भाग.
लपाछपी – खेळताना बोललेल्या वाक्य, शब्दांचं भाषांतर.
१ ते २५ आकडे.

१० नोव्हेंबर
ने, ला, च्या इत्यादीचा वाक्यातील मोकळ्या जागेत उपयोग करणे.
ती साबण चेहरा धुतला – तिने साबणाने चेहरा धुतला.
ती आई टॉवेल दिला – तिला आईने टॉवेल दिला.
ती डोकं आंघोळ केली – तिने डोक्यावरुन आंघोळ केली.
ती टॉवेल केस पुसले – तिने टॉवेलने केस पुसले.
ती केस सुकले – तिचे केस सुकले.
वरील सर्व वाक्य भूतकाळात आहेत. सर्व वाक्य वर्तमानकाळात सांगणे.

टिपूच्या गोष्टीतील काही भाग आणि शब्दांचा अर्थ. टिपूच्या गोष्टीतील वाक्याचा काळ सांगणे.
वाचन, लेखन.

३ नोव्हेंबर २०१९
मराठी कविता – गवताचं पातं वार्‍यावर डोलतं. या कवितेवर संगीत खुर्ची. कवितेतील सर्व शब्दांचा अर्थ. – पाखरु, पातं, फांद्या, आंबा इत्यादी.
अति तिथे माती आणि पालथ्या घड्यावर पाणी या म्हणींचा अर्थ आणि मुलांनी यावरुन प्रसंग सांगणे/ प्रवेश करणे
इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषांतर करणे I come, I am coming, I was coming, I will come इत्यादी.
वाचन, लेखन.


ऑक्टोबर २०१९

ऑक्टोबर २७
शुभ दिपावली, हार्दीक, शुभेच्छा इत्यादी शब्दांचा अर्थ.
घरुन शाळेपर्यत येताना दिसणार्‍या गोष्टी आणि घरात असणार्‍या गोष्टी सांगण्याची दोन गटात स्पर्धा. प्रत्येक गटाने कमीतकमी २० शब्द सांगणे. त्यातले शब्द वापरुन वाक्य.

मुलांनी सांगितलेले शब्द
घर ते शाळा – रस्ता, लोक, गाडी, घर, झाड, पाणी, दिवे, दगड, पक्षी, नदी, फुलं, गवत, पानं, भाज्या, ससा, किडे, मांजर, शाळा, पदपथ, हरिण
घरातील गोष्टी – दार, भितं, पंखा, खिडकी, दूरदर्शन, चित्र, मुलं, झाड, खाद्यपदार्थ, सोफा, फोन, घड्याळ, दिवे, खुर्ची, टेबल, पुस्तक, कपडे, उशी, मांजर, कुत्रा, पाणी, पेला, काच.

मोठा गट – प्रेम, राष्ट्र, सर्व, सार्‍या या शब्दांमधील रफारचा वापर का, केव्हा आणि कसा करायचा. मुलांनी एकमेकांना शब्द सांगायचे आणि त्यांनी ते लिहायचे. नंतर वाक्यातल्या मोकळ्या जागा भरुन वाक्य पूर्ण करायचं.
पंख्या… बसून मी दूरदर्शन… चित्र… होतो/होते
तयार होणारं वाक्य – पंख्याखाली बसून मी दूरदर्शन बघत चित्र काढत होते/होतो.

२० ऑक्टोबर
स्मरण/आठवण – (Memory Game) पत्ते. खेळताना प्रत्येक पत्त्याला मराठीत काय म्हणतात ते शिकणे. यातूनच आकड्यांचा परिचय.
मी, माझे, मला, माझ्याकडे, तू, तुझे, तुला तुझ्याकडे याचा ’हात’ या शब्दाबरोबर वापर.
मुळाक्षर उजळणी, लेखन.
वर्गातील प्रेमळ भूत गोष्ट.

५ ऑक्टोबर 
मी, मला, माझं, माझ्याकडे.
तू, तुला, तुझं, तुझ्याकडे.
आम्ही, आम्हाला, आमचं, आमच्याकडे.
ते, त्यांना, त्यांचं, त्यांच्याकडे.
माझ्याकडे, तुझ्याकडे, आमच्याकडे, त्यांच्याकडे या सर्वांचा वाक्यात वापर.
प्रत्येकाने पाच वाक्य मुकाभिनयाने करायची. इतरांनी पूर्ण वाक्यात वापर करुन काय चालू आहे ते सांगायचं.
वाचन, लेखन.

सप्टेंबर २०१९

२९ सप्टेंबर 
मुळाक्षरं उजळणी.
रडणे, शाळा, मुलगा यावरुन मुलांनी गटागटाने प्रवेश सादर करणे.
म ची बाराखडी, लेखन.

२२ सप्टेंबर २०१९
घड्याळ – पाच, दहा, पंधरा, वीस – पाच – पाच मिनिटं. अर्धा तास, पाऊण तास इत्यादी.
मुळाक्षरं उजळणी.
लपाछपी – खेळताना ज्याच्यावर राज्य त्याने १ ते ५० आकडे म्हणण्याचा प्रयत्न. शोधताना, पकडताना म्हटलेल्या इंग्रजी. शब्दांचं भाषांतर.

१५ सप्टेंबर
भाताचं वर्णन वाक्यात करणे.
आमटीचं वर्णन वाक्यात करणे.
मराठी आणि इंग्रजीमधील फरक प्रत्येकाने मराठीत सांगायचा प्रयत्न करणे.
हात, पाय, डोळा… अवयवाचं एकवचन, अनेकवचन.
जाणे, बघणे, लिहिणे, वाचणे या क्रियापदांचा वर्तमानकाळात वापर. मी जातो/जाते, मी लिहिते/लिहितो…

८  सप्टेंबर
प्रत्येकाने आपली ओळख करुन देणे.
दोन गटात शब्द अंताक्षरी स्पर्धा.
शाळेतलं भूत गोष्ट.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी