डिसेंबर (क)

३१ डिसेंबर २०१७

सुटीत काय केलं ते प्रत्येकाने सांगणे.
सर्व वाक्य अपूर्ण भूतकाळात सांगणे. ( उदा. मी खात होतो/होते.)
खोलीभर प्रकाश गोष्ट.
चित्रातील गोष्टी ओळखून मराठीत सांगणे.
ज्यांना वाचता येतं त्यांनी ५ शब्द वाचून दाखविणे किंवा अक्षरं ओळखणे.
लेखन.


गोष्ट :
एक शेतकरी होता. त्याने मुलांना दोन रुपये दिले.
“यातून घर भरेल अशी वस्तू आणा.” मुलांना त्याने सांगितले.
मुलं पैसे घेऊन बाजारात गेली. दोन रुपयात घर भरेल असं काही मिळेना. मुलांनी खूप विचार केला. त्यांना एक कल्पना सुचली. दोघांनी पणती विकत घेतली.
संध्याकाळी त्यांनी पणती पेटवली. खोली प्रकाशाने भरुन गेली. शेतकरी खूष झाला. मुलांना त्याने शाबासकी दिली.

१७ डिसेंबर २०१७

इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत सांगणे.
वाक्यांचं भाषांतर करणे. (सर्व वर्तमानकाळ)
विचारलेल्या प्रश्नांना पूर्ण वाक्यात उत्तर देणे.
शब्दांवरुन एकत्रित गोष्ट करुन गटाने सांगणे.
वाचन, लेखन.

१० डिसेंबर २०१७

छोटा गट – तळ्य़ात- मळ्यात, आईचा रुमाल हरवला खेळ.
मोठा गट – दिलेल्या शब्दांचे अर्थ सांगून प्रवेश तयार करुन सादर करणे. फळ्यावर लिहिलेला कोणता शब्द बरोबर आहे ते सांगणे.
दोन्ही गट – गोष्ट, शब्दाक्षरी, कविता, वाचन, लेखन.

 

 

 

३ डिसेंबर २०१७

चित्रावरुन वाक्य. मग त्याची पूर्ण गोष्ट तयार करुन सांगणे.
खोलीतल्या गोष्टी सांगणे. प्रत्येक गोष्टीचं अनेकवचन सांगून वाक्यात उपयोग.
हात- पाय गाणं.
फळ्यावरील शब्द वाचणे, लिहिणे (ज्यांना वाचता- लिहिता यायला लागलं आहे त्यांच्यासाठी)
वर्णमाला वाचन, लेखन.