जानेवारी (क)

१४ जानेवारी २०१८

घरात एकूण खुर्च्या किती ते मोजून सांगणे.
जिन्याच्या पायर्‍या मोजणे.
१ ते २५ आकडे.
हात पाय गाणं.
वर्णमाला वाचन.
बाराखडी आणि लेखन.

मोटू उंदीर गोष्ट. ती प्रत्येकाने सांगायचा प्रयत्न करणे. गोष्टीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करणे.

मोटू नावाचा उंदीर होता. तो खट्याळ होता. सारखा बिळाबाहेर खेळायचा. आई त्याला सांगायची, “मोटू, मांजर तुला पकडेल. बाहेर खेळू नकोस.” मोटू म्हणायचा, “मी नाही लपून बसणार. मला खेळायला आवडतं.” एकदा तो सोनूच्या घरी गेला. सोनू आंघोळ करत होता. सोनू बाहेर आला. मोटू आत गेला. साबणाची बाटली मोटूने कुरतडली. सगळा फेस बाहेर आला. मोटूच्या अंगावर सांडला. काळा मोटू पांढरा झाला. सोनूने मोटूला पाहिलं. सोनू किंचाळला. मोटू पळाला. मोटू घरी आला. पण त्याला कुणी ओळखलं नाही. तो इकडे तिकडे फिरत राहिला. मांजराने त्याच्यावर झडप घातली. मोटू गटारात पडला. पाण्यात बुडाला. त्याची आंघोळ झाली. मोटू पुन्हा काळा झाला. तो घरी आला. सर्वांनी त्याला ओळखलं. मोटू आता आईचं ऐकतो. तो बिळातच राहतो.

७ जानेवारी २०१८

समोर ठेवलेल्या वस्तूंची नावं मराठीत सांगणे – गाळणं, पळी वगैरे.
हात – पाय गाणं प्रत्येकाने हावभावासकट म्हणणे.
वर्तमानकाळाचा वापर वाक्यात मी, तू, ती, आम्ही वापरुन करणे. जसं मी खेळते/खेळतो, तू खेळतेस/खेळतोस….
लपाछपी – ज्याच्यावर राज्य त्याने आकडे म्हणणे. खेळताना वापरलेल्या इंग्रजी वाक्यांचं भाषांतर.
रंग
गोष्ट सांगणे.
वाचन आणि लेखन.
लिहिता वाचता येणारा गट – शब्दकोडं. सांगितलेले इंग्रजी शब्द कोड्यातून शोधणे. लिहिणे. वाचणे.