ऑक्टोबर (क)

२९ ऑक्टोबर २०१७

वेलांटी, उकार इत्यादी चिन्ह ओळखणे. दिलेल्या अक्षराची बाराखडी तयार करणे. लिहिणे.
२ गोष्टी – मुर्ख मुलगा आणि राम. काही मुलांनी या गोष्टी सांगितल्या. काहींनी त्यातील शब्दांचे अर्थ आणि इतरांच्या मदतीने गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला.
लपाछपी – ज्याच्यावर राज्य त्याने आकडे म्हणणे. सापडलेल्या मुलांनी बसून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.

Sign

२२ ऑक्टोबर २०१७

स्वयंपाकघरातील वस्तूंवर गाणं.
सर्वनामांचा वापर करुन वाक्य पूर्ण करणे.
मुलांनी विचारलेल्या शब्दांचे अर्थ सांगणे.
गेल्या महिन्यातील डास आणि मुर्ख मुलगा ही गोष्ट प्रत्येकाने सांगणे.
बापूंच्या ३ गोष्टी ही गोष्ट. ती प्रत्येकाने सांगणे.
फळ्यावर लिहिलेली वाक्य वाचणे.
वर्णमाला, बाराखडी.

१५ ऑक्टोबर २०१७

काजव्याची गोष्ट ऐकणे. त्यातील कठीण शब्दांचे अर्थ. प्रत्येकाने गोष्ट सांगण्याचा प्रयत्न.
वाराचं गाणं, १ ते ५० आकडे.
इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ सांगणे.
वाचन/वर्णमाला वाचन, लेखन.

८ ऑक्टोबर २०१७

अवयव गाणं मी म्हणणार आणि मुलांनी गाण्यातले अवयव दाखवायचे. जसं हात, पाय असं म्हटलं की हात आणि पाय उंच करायचे 🙂
मुळाक्षरांना काना लावून सगळी अक्षरं लिहिणे – का, खा, गा…. ज्यांना अजून लिहिता येत नाही त्यांनी म्हणणे
यावेळचे शब्द – पुस्तक, वही, खोडरबर, फळा, खडू.
गोष्ट ऐकणे, सांगायचा प्रयत्न करणे.