एप्रिल (क)

29 एप्रिल 2018

म हे अक्षर गिरविणे. मोठा गट – म, न, भ, त ही अक्षरं लिहिणे. त्यातील अक्षरांचा वापर करुन
मन, तन, मत, ताक, मान, भात हे शब्द.
चित्रावरुन वाक्य तयार करणे.
मावशी म्हणते… खेळ. झोपणे, डोकं खाजवणे इत्यादी.

22 एप्रिल 2018

कालनिर्णय ( दिनदर्शिका) आणि मराठी महिने ओळख.
अ, आ आई गाणं.
रामची गोष्ट प्रत्येकाने सांगायचा प्रयत्न.
क, ख, ग, घ यावरुन सुचतील ते शब्द सांगणे.
इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषांतर.
मोठा गट – चित्रावरुन प्रवेश सादर करुन दाखविणे.

१५ एप्रिल २०१८

दुकानदार आणि राम ही गोष्ट प्रत्येकाने सांगणे.
वर्णमाला वाचन आणि आपापल्या नावातली अक्षरं ओळखायचा प्रयत्न.
अ, आ आई, म, म मका गाणं.
मोठा गट – जी येतात ती अक्षरं लिहिणे. त्या अक्षरांचा वापर करुन सांगितलेल्या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात ते सांगून लिहिणे.

८ एप्रिल २०१८

लपाछपी – राज्य असलेलं मुल १ ते २५ आकडे म्हणणार. खेळताना वापरलेल्या इंग्रजी शब्दांचं भाषांतर प्रत्येकाने करणे.
ईचा पूचा गोष्ट.
वर्गातल्या प्रत्येकाच्या नावातलं एक अक्षर वर्णमालेतून ओळखण्याचा प्रयत्न करणे.
रंग, अवयव.
वाक्यांची अंताक्षरी.
वार, दिवस, वर्ष, आज, उद्या, काल, परवा अशा शब्दांची ओळख.
लेखन, वाचन.