Author: Marathi Shala

वर्ष: ऑगस्ट २०१७ ते जून २०१८

२०१७ ते २०१८ : वर्षभरात मुलं काय शिकली:

इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तींची ओळख:
स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, शिवाजीमहाराज.

भाषण/मुलाखत:
मी पाहिलेला भारत, मला कोण व्हायचं आहे असे अनेक विषय.
शब्दांवरुन गोष्ट तयार करुन सांगणे.
गोष्टीला शेवट सुचविणे.
एखाद्या विषयावर तयारी करुन एकमेकांची मुलाखत घेणे. (शिक्षक, नट, शिपाई, न्हावी, नृत्यांगना…)

व्याकरण:
नाम, सर्वनाम, काळ, ‌पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गगारचिन्ह, प्रश्नचिन्ह, र्‍हस्व – दीर्घ, रफार नियम, मुळ शब्द आणि सामान्यरुप होताना त्याचं बदलणारं रुप,
एकाक्षरी इकारान्त किंवा उकारान्त शब्द दीर्घ असतात. उदा. ही, मी, धू, तू.
अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाचं अनेकवचन एकारान्त होते. घर – घरे, पान – पाने, दार – दारे.
मराठी शब्दांतील अकरान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. उदा. खीर, मूल, गरीब नीट. पण, तत्सम (संस्कृत) शब्दांतील अकरान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्वच राहतात.
उदा. गुण, दिवा, मंदिर, हिम, बुध.
वर्णमालेत नव्याने आलेल्या ’अॲ आणि ऑ’ ची ओळख.
स्वर आणि स्वरादीतील फरक (स्वर अ ते औ. अं आणि अ: हे स्वरादी आहेत).
अनुस्वार आणि विसर्ग ओळख (अं – अ वर असलेलं टिंब हा अनुस्वार आहे. तर अ: – : याल विसर्ग म्हणतात).
व्याकरणाचा नियम ऐकणे आणि त्यावरुन शब्द सांगणे. उदा. आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते. हा नियम मुलांना सांगितल्यावर त्यांनी तो नियम लागू होत असेलेले शब्द सांगणे.

वाचन, लेखन, कृती:
पुस्तकातील धडा वाचून दाखविणे. लिहिणे.
एकाच शब्दांचे होणारे वेगळे अर्थ आणि त्यावरुन प्रवेश तयार करुन सादर करणे.
गाळलेल्या जागा भरुन वाक्य पूर्ण करणे. उदा. … झोप येते. …. मी लवकर …
म्हणी आणि अर्थ. उदा. उथळ पाण्याला खळखळाट फार, आरोग्य हेच ऐश्वर्य आणि चकाकते ते सारेच सोने नसते.
मराठी बोलताना येणारे इंग्रजी शब्द आणि त्याला पर्याय. उदा. अडचण, समस्या, प्रश्न, कठीण या शब्दांचा वापर problem म्हणण्याऐवजी कसा करु शकतो. परिस्थितीप्रमाणे शब्दांचा उपयोग.
समान आणि विरुद्ध अर्थी शब्दांची ओळख.
मराठी महिने आणि दिशांची ओळख.
नवीन शब्दांची ओळख आणि त्याचा वापर.
लिहिलेल्या शब्दांत काय चुकलं आहे ते सांगून बरोबर करणे.

गोष्टी:
बदकाची हुशारी, राजूची आई, भुयार, धाडस.

खेळ:
लगोरी, खो-खो, कबड्डी, पत्ते, लपाछपी.

वर्ष: ऑगस्ट २०१७ ते जून २०१८

२०१७ ते २०१८ : वर्षभरात मुलं काय शिकली:

गोष्टी:
आईची थप्पड , घरभर प्रकाश , डास आणि मुर्ख मुलगा, दिनूचे बिल , घारीची चलाखी .

कविता/गाणी:
हातापाय, संगत, स्वयंपाक, गंमत, असे कसे?

खेळ:
सागरगोटे , पत्ते – चॅलेंज. मराठीत पत्यांची ओळख, लगोरी, कबड्डी.
मुकाभिनय – इतरांनी ओळखून वाक्य तयार करणे.
लपविलेल्या गोष्टी शोधणे –  त्या गोष्टींचे अनेकवचन सांगणे आणि दोन गटांनी या शब्दांचा वापर करुन प्रवेश सादर करणे.
चिठ्ठीतील शब्द वाचणे, लिहिणे व त्यावरुन प्रवेश सादर करणे.
दोन गटात स्पर्धा – इंग्रजी पुस्तकातील गोष्ट मराठीतून सादर करणे. दुसर्‍या गटाने वाक्यात काय चुकलं ते सांगणे.

अभ्यास:
सर्वनामांचा वापर करुन वाक्य. उदा. धावणे हा शब्द. + वाक्य पूर्ण करणे. उदा. आई मोठ्याने….. (बोलते, ओरडते, गाते इत्यादी).दादा माझ्याबरोबर… (खेळतो, भांडतो, अभ्यास करतो इत्यादी)
दाखविलेले अवयव ओळखणे – उदा. भुवई, पापणी, पाऊल, तळपाय.
चित्रातील दिनक्रम वर्तमानकाळात आणि भूतकाळात सांगणे. चित्रावरुन गोष्ट तयार करणे.
चवींची ओळख. पदार्थ आणि त्या पदार्थांची नावं – जसं – salt म्हणजे – मीठ – मिठाची चव – खारट. तसंच त्या त्या पदार्थाचं लिंग – साखर – ती साखर…
आकडे, वाराचं गाणं, स्वयंपाक गाणं, अवयव गाणं.
कालनिर्णय ( दिनदर्शिका) आणि मराठी महिने ओळख.
शब्दांचे वाक्यात उपयोग करताना होणारे बदल सांगणे. (सामान्यरुप – उदा. जीभ – जिभेला, मूल – मुलांना इत्यादी.)
लिंगभेदामुळे होणारे बदल शिकणे/वाक्यात वापरणे.
एकाच वाक्याचा उपयोग वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात करणे.
शब्दांचा वापर करुन तिन्ही काळात वाक्य तयार करणे. शब्दांचं सामान्यरुप सांगणे. जसं – खाणे – खायला, खाताना.
फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे, अर्थ सांगणे, जे शब्द वाचता आले ते वहीत लिहिणे. त्या शब्दांचा वापर करुन वाक्य तयार करणे.
फळ्यावरची चित्र ओळखणे.
प्रत्येकाने एक मिनिटं काहीही बोलणे.
उच्चार आणि शब्दातील फरक – जसं मुलं म्हणताना घर हा शब्द नकळत गर उच्चारतात. पाऊस ला पौस म्हणतात. फळ्यावर ते शब्द लिहून कुठला बरोबर ते मुलांनी सांगणे.

वर्ष – ऑगस्ट २०१७ ते जून २०१८

२०१७ – २०१८ : वर्षभरात मुलं काय शिकली:

गोष्टी:
डास आणि मुर्ख मुलगा, ससा आणि कासव, राम आणि दुकानदार, खोलीभर प्रकाश, काजव्याची गोष्ट, मोटू उंदीर. कावळ्याला तहान लागली, टोपीविक्या आणि माकड.
गोष्टींचं प्रवेशरुपी सादरीकरण.
चित्रातील गोष्टी ओळखणे व त्यावरुन गोष्ट तयार करणे.
गोष्टींतील शब्दांचे अर्थ सांगणे. गोष्ट प्रत्येकाने सांगायचा प्रयत्न करणे.

कविता:
अवयव गाणं, अ, आ आई गाणं, गोल गोल फिरू… नाच, संगत कविता.

खेळ:
पत्ते – भिकार सावकार – मराठीत पत्यांची ओळख.
खो, खो, लगोरी, आईचा रुमाल हरवला, माझी टोपी हरवली, लपाछपी.
चित्र पाहून त्यात काय घडतंय ते सांगणे.
लपविलेल्या गोष्टी शोधणे – खडू, चेंडू, केस, कागद, रुमाल. त्या शब्दांचे अनेकवचन सांगणे.
शब्दांची अंताक्षरी.
शब्दांवरुन एकत्रित गोष्ट करुन गटाने सांगणे.
मावशी म्हणते खेळ – उड्या मारा, झोपा…

अभ्यास:
वार, अवयव, आकडे, रंग, प्राणी, पक्षी.
वेलांटी, उकार, काना, मात्रा, अनुस्वार, विसर्ग ही चिन्ह ओळखणे.
मुळाक्षरं न बघता प्रत्येकाने म्हणून दाखविणे.
दिलेल्या अक्षराची बाराखडी तयार करणे.
वर्णमालेतील अक्षर लेखन, गिरविणे.
एक अक्षर घेऊन त्या अक्षराने सुरु होणारे शब्द सांगणे.
इंग्रजी शब्दांचे अर्थ सांगणे.
चित्रात दिसणार्‍या गोष्टी काय आहेत त्या सांगणे. त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात देणे.
मुकाभिनय करणे. बाकीच्या मुलांनी समोर काय चालू आहे त्याबद्दल वाक्य तयार करणे.
जिन्याच्या पायर्‍या मोजणे.
वर्गात येताना दिसलेल्या गोष्टींचा उपयोग वाक्यात करणे – उदा. जिना, पायर्‍या, दारं, भितं…
घरातील सांगितलेल्या वस्तू मोजणे.