२२ मार्च
नियम – अकारान्त शब्दाच्या आधीचं अक्षर दीर्घ असतं – कठीण, पूस, धूर, धूळ, खूप, दूर इत्यादी.
लेखन – धूर झाला, खूप धूर झाला, तू पाय पूस
एकाक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात – मी, ही, ती, तू, धू, पू
लेखन – तू हात धू, तू पाय धू, तू दूर गेलीस इत्यादी.
दोन्ही नियम प्रत्येकाने सांगणे.
रफार नियम आणि शब्द.
सर्व, कर्म, धर्म
सार्‍यांना, वार्‍यावर, थार्‍यावर
राष्ट्र, ट्रम्प
क्रम, भ्रम, व्रण

१ मार्च २०२०
प्रत्येकाने पुस्तकातील उतारा वाचून दाखविणे.
चित्रावरुन वाक्य लिहिणे. उदा. दूधवाल्याने दूध आणलं. मांजर भांडं घेऊन आलं. भांडं पडलं. मांजर पळालं.
व्याकरण नियम.
आकारान्त पुल्लिंगी शब्दांचं अनेकवचन एकारान्त होतं. – घोडा – घोडे, कुत्रा – कुत्रे, आंबा – आंबे, ससा – ससे.
पुल्लिंगी असलेल्या पण आकारान्त नसलेल्या शब्दांचं अनेकवचन तेच राहतं – देव – देव, उंदीर – उंदीर, लाडू – लाडू.

१९ जानेवारी २०२०
बदललेल्या संख्यावाचन पद्धतीवर you tube वरील मंगला नारळीकर यांचं भाषण पाहणे. काय समजलं ते सांगणे.
तान्हाजी वंशज – चित्रफित पाहून काय समजलं ते सांगणे.
चित्रावरुन वाक्य तयार करुन ती लिहिणे.

१५ डिसेंबर २०१९
नाम आणि त्याचे लिंग ओळखणे
ते घर दगडी आहे. ती घरे दगडी आहेत.
हे फूल जांभळे आहे. ही फुले जांभळी आहेत.
हे घड्याळ बंद आहे. ही घड्याळे/घड्याळं बंद आहेत.
नाम – घर, फूल,  घड्याळ – नपुंसकलिंगी.
नियम – अकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. नपुंसकलिंगी शब्द सांगून त्याचं अनेकवचन तसंच वाक्यात रुपांतर करणे. (दार, पुस्तक इत्यादी)

झाडावर एक पाखरु आहे. झाडावर दहा पाखरे आहेत.
आईने एक लिंबू आणलं. आईने दहा लिंबे/लिबं आणली.
डोळ्यातून एक आसू आला. डोळ्यातून आसवे आली.
नियम – उकारान्त आणि ऊकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. क्वचित प्रसंगी ते वेकारान्त होते.

वाचन आणि नविन शब्दांचे अर्थ.


१७ नोव्हेंबर २०१९
वाचन.
जोडाक्षर लेखन.
क्रम, ट्रम्प यासारख्या शब्दांमधील ’र’ कुठे आणि का द्यायचा याबाबत स्पष्टीकरण आणि तशा शब्दांचं लेखन, वाचन.
व्याकरण उजळणी:
मी, ही, तू, धू, पू – इकारान्त आणि उकारान्त एकाक्षरी शब्द दीर्घ असतात.
मूल, पूल, धूर, पूर – अकारान्त शब्दांच्याआधी येणारं अक्षर दीर्घ असतं. अपवाद – गुण, कारण संस्कृत शब्द जसेच्यातसे मराठीत येतात.
मुलाला, पुलावार, धुराने, पुरामुळे – शब्दाचं स्वरुप प्रत्यय जोडल्यावर बदलतं.


२०ऑक्टोबर २०१९
पडणे, थोडावेळ पडणे, तोंडघशी पडणे, डोक्यावर पडणे, पड खाणे यांचा वेगवेगळ्या वाक्यात वापर करुन लिहिणे.
पुस्तकातला उतारा वाचणे.
वर्गातील प्रेमळ भूत गोष्ट ऐकणे.
व्याकरण नियम उजळणी.


२२ सप्टेंबर २०१९
 हार मानणे, पत्करणे, खाणे, हार घालणे या सर्वांचा वाक्यात वापर करुन लिहिणे

व्याकरण नियम:
इकारान्त किंवा उकारान्त एकाक्षरी शब्द दीर्घ असतात. उदा. मी, ही, ती, तू, पू, धू.
अकारान्त शब्दांच्या अलिकडचं अक्षर दीर्घ असतं. उदा. धूर, पूर, मूल, कठीण, वाईट.