6 मे 2018

चवींची ओळख. पदार्थ आणि त्या पदार्थांची नावं.
जसं – salt म्हणजे – मीठ – मिठाची चव – खारट…
तसंच त्या त्या पदार्थाचं लिंग – साखर – ती साखर…
मोठा गट – चित्रावरुन भूतकाळ आणि वर्तमानकाळ वापरुन वाक्य.
छोटा गट – कावळ्याला तहान लागली गोष्ट – प्रवेशरुपी सादरीकरण.
‘संगत’ कविता.
कुत्रा हा शब्द वापरुन वाक्य तयार करणे.
वाचन, लेखन.

___________________

संगत

निळं आकाश
अंधुक प्रकाश
चमकता तारा
गार वारा!

चल ना आई,
जमिनीवर झोपू!
आकाशातल्या चांदण्या
किती ते मोजू!

चंद्र आला सोबतीला
बाबा लागला गायला!
ही खरी गंमत
अशीच हवी रोज संगत! – मोहना जोगळेकर