२१ जानेवारी २०१८

प्रत्येक शब्द वर्तमानकाळात वापरणे.
उभं राहणे, एकटक पाहणे, आणणे, बांधणे, ठेवणे, माफ करणे…. (मी उभा राहतो/राहते)
गोष्ट सांगणे. मोटू उंदीर गोष्टीतील अर्धवट सांगितलेलं वाक्य पूर्ण करणे. (मोटू नावाचा…. मुलांनी उंदीर होता हे सांगणे. अशा पद्धतीने पूर्ण गोष्ट)
लिहिणे, वाचणे.

कविता

सोमवार म्हणजे Monday
मंगळवार म्हणजे Tuesday
आम्ही गिरवतो मराठीचे धडे!

Wednesday म्हणजे बुधवार
Thursday म्हणजे गुरुवार
काहीतरी पाहिजे गारेगार!

Friday म्हणजे शुक्रवार
Saturday म्हणजे शनिवार
आठवड्यात आहेत सात वार!

मोटू उंदीर गोष्ट 
मोटू नावाचा उंदीर होता. तो खट्याळ होता. सारखा बिळाबाहेर खेळायचा. आई त्याला सांगायची, “मोटू, मांजर तुला पकडेल. बाहेर खेळू नकोस.” मोटू म्हणायचा, “मी नाही लपून बसणार. मला खेळायला आवडतं.” एकदा तो सोनूच्या घरी गेला. सोनू आंघोळ करत होता. सोनू बाहेर आला. मोटू आत गेला. साबणाची बाटली मोटूने कुरतडली. सगळा फेस बाहेर आला. मोटूच्या अंगावर सांडला. काळा मोटू पांढरा झाला. सोनूने मोटूला पाहिलं. सोनू किंचाळला. मोटू पळाला. मोटू घरी आला. पण त्याला कुणी ओळखलं नाही. तो इकडे तिकडे फिरत राहिला. मांजराने त्याच्यावर झडप घातली. मोटू गटारात पडला. पाण्यात बुडाला. त्याची आंघोळ झाली. मोटू पुन्हा काळा झाला. तो घरी आला. सर्वांनी त्याला ओळखलं. मोटू आता आईचं ऐकतो. तो बिळातच राहतो.