२१ जानेवारी २०१८

मावशी म्हणते खेळ – उड्या मारा, झोपा…
हिरवा, लाल आणि तपकिरी रंग खेळ.
लिहिणे, वाचणे, गोष्ट सांगणे.
प्रत्येक शब्द वर्तमानकाळात वापरणे.
जाणे, वाचणे, सांगणे, म्हणणे, बोलणे… (मी जातो/ मी येते )

असे कसे हे पुस्तकातील गाणं.

असे कसे?

दोन पाय छोटे
दोन पाय मोठे
कांगारुच्या पोटाला
पिशवी कोण शिवते?

एवढासा ससा त्याचे
एवढे मोठे कान,
एवढा मोठा हत्ती
त्याचे शेपूट मात्र लहान.

एक डोळा बंद करुन
बगळा बसतो टपून,
पाठीवरचं ओझं कसं
कासव ठेवतं जपून?

पंख असून शहामृग
उडत नाही कसं?
कुणी दिली मोराला
ही रंगीत पिसं?