१४ जानेवारी २०१८

राजूची आई गोष्टीतील उतारा लिहिणे, वाचणे.
विरुद्ध अर्थी शब्द.
गुण – अवगुण, प्रगती – अधोगती, अवघड – सोपं, आदर – अनादर, आशा – निराशा.
या शब्दावरुन गोष्ट किंवा प्रवेश सादर करणे.
वाचन, लेखन.

 

 

 

 

 

उन्हाळ्याची सुट्टी होती. बागेत भेळवाले, फुगेवाले यांची झुंबड उडाली होती. मी बाकावर बसले. मीनू झोपाळ्यावर झोका घेत होती. तेवढ्यात एक बाई आल्या.
“राजू, अरे कुठे आहेस?” म्हणत त्या रडायला लागल्या. आम्ही सर्व मदतीला धावलो. राजू सापडला नाही. त्या बाई हताश झाल्या. “घरी गेला असेल.” आम्ही तिची समजूत घातली. मी ती कुठे राहते ते शोधून काढलं. तिच्या घरी न राहवून गेलेच दोन दिवसांनी.
एका आजोबांनी दार उघडलं. “राजू मिळाला का?” मी विचारलं.
“कोण राजू?” त्यांनी आश्चर्याने विचारलं.