७ जानेवारी २०१८

मोठा गट – गोष्टीतील ३ रा लिहिणे. भाग १, २, ३ वाचून दाखविणे. हीच गोष्ट प्रवेश करुन सादर करुन दाखविणे.
छोटा गट – पुस्तकातील छोटा धडा वाचणे. शब्द लिहिणे. आणि चकाकते ते सर्वच सोने नसते या म्हणीवरुन प्रवेश सादर करणे.
दोन्ही गट – उथळ पाण्याला खळखळाट फार, आरोग्य हेच ऐश्वर्य आणि चकाकते ते सारेच सोने नसते या म्हणी आणि त्याचा अर्थ.

 


उन्हाळ्याची सुट्टी होती. बागेत भेळवाले, फुगेवाले यांची झुंबड उडाली होती. मी बाकावर बसले. मीनू झोपाळ्यावर झोका घेत होती. तेवढ्यात एक बाई आल्या.
“राजू, अरे कुठे आहेस?” म्हणत त्या रडायला लागल्या. आम्ही सर्व मदतीला धावलो. राजू सापडला नाही. त्या बाई हताश झाल्या. “घरी गेला असेल.” आम्ही तिची समजूत घातली. मी ती कुठे राहते ते शोधून काढलं. तिच्या घरी न राहवून गेलेच दोन दिवसांनी.