३१ डिसेंबर २०१७

सुटीत काय केलं ते प्रत्येकाने सांगणे.
सर्व वाक्य अपूर्ण भूतकाळात सांगणे. ( उदा. मी खात होतो/होते.)
खोलीभर प्रकाश गोष्ट.
चित्रातील गोष्टी ओळखून मराठीत सांगणे.
ज्यांना वाचता येतं त्यांनी ५ शब्द वाचून दाखविणे किंवा अक्षरं ओळखणे.
लेखन.


गोष्ट :
एक शेतकरी होता. त्याने मुलांना दोन रुपये दिले.
“यातून घर भरेल अशी वस्तू आणा.” मुलांना त्याने सांगितले.
मुलं पैसे घेऊन बाजारात गेली. दोन रुपयात घर भरेल असं काही मिळेना. मुलांनी खूप विचार केला. त्यांना एक कल्पना सुचली. दोघांनी पणती विकत घेतली.
संध्याकाळी त्यांनी पणती पेटवली. खोली प्रकाशाने भरुन गेली. शेतकरी खूष झाला. मुलांना त्याने शाबासकी दिली.