१७ डिसेंबर २०१७

नवीन गट – गोष्ट सांगणे.
जुना गट – प्रवेश सादर करणे. (फळ्यावरचे कोणतेही ५ शब्द वापरणे.)
सर्व शब्दांचे अर्थ सांगणे.
वाक्यात उपयोग करणे.
गोष्ट.
वाचन, लेखन.

 या व्यतिरिक्त शब्द –
Blink
Lie
Stare
Bend
Nod
Wipe
Build
Choose
Forgive
Feel
Erase


चतुर बिरबल

शिवराम गाय घेऊन घरातून निघाला. बाजारात नेऊन तो गाय विकणार होता. मागून सदा येत होता. त्याने जबरदस्ती करुन शिवरामची गाय घेतली.

शिवराम बादशहाकडे गेला.
“सदाने माझी गाय चोरली.” शिवरामने तक्रार केली. बादशहाने गाय घेऊन सदाला दरबारात बोलावलं.
“ही गाय माझी आहे.” सदा म्हणाला.
बादशहाने बिरबलाचा सल्ला मागितला.
बिरबलाने शिवरामला गाईचे नाव विचारले आणि दोघांना दूर उभं राहायला सांगितलं.
“गाईला तिच्या नावाने हाक मारा.” त्याने हुकूम सोडला. दोघांनी हाक मारली. गाय शिवरामजवळ येऊन उभी राहिली.
“आता दोघंही गाईकडे पाठ फिरवून चालायला लागा.” दोघांनी चालायला सुरुवात केली. गाय शिवरामच्या मागून जायला लागली.

बादशहाने गाय शिवरामला परत केली आणि सदाला शिक्षा सुनावली.