१० डिसेंबर २०१७

गोष्ट  ऐकणे. त्यातील शब्दांचे अर्थ.
प्रत्येकाने ती गोष्ट सांगणे.
फळ्यावरील इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत सांगणे.
शब्दावरुन प्रवेश तयार करुन सादर करणे.
वाचन, लेखन.


घरभर प्रकाश
एक गाव होतं. गावात एक शेतकरी राहत होते. त्यांचं नाव केशवकाका. त्यांना दोन मुलं होती.

एकदा केशवकाकांनी मुलांना दोन – दोन रुपये दिले. ते म्हणाले,
“मुलांनो, या पैशातून घर भरुन जाईल अशी वस्तू आणाल का?”

मुलं दुकानात गेली. तिथे त्यांना खूप वस्तू दिसल्या. अचानक दोघांना एक कल्पना सुचली. दोघांनी एक पणती विकत घेतली. मुलं घरी आली. पणतीत तेल घातले. कापसाची वात केली. संध्याकाळी पणती लावून ठेवली.

केशवकाका खूष झाले.
“कमालच केली तुम्ही.” ते म्हणाले. मुलं म्हणाली.
“आम्ही घर भरुन जाणारी वस्तू आणली. घरात सगळीकडे प्रकाश भरला आहे.”

केशवकाकांनी मुलांना जवळ घेतलं. ते म्हणाले,
“तुमची कल्पकता आवडली. शाब्बास.”