३ डिसेंबर २०१७

प्रत्येकाने दिलेल्या मासिकातील एक उतारा वाचणे. सर्वात जास्त आवडलेल्या उतार्‍याची गोष्ट, पुढील काही आठवड्यात वाचून लिहून पूर्ण करायची आहे – (मोठा गट).
पुस्तकातील धडा वाचून दाखविणे, गोष्ट सांगणे – (छोटा गट).

व्याकरण नियम:

  • मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात पण तत्सम (संस्कृत) शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्वच राहतात.
    उदा. मराठी शब्द – खीर, गरीब, बहीण, मूल. तत्सम (संस्कृत) शब्द – गुण, मंदिर, सुख
  • वर्णमालेत नव्याने आलेल्या ’ॲ आणि ऑ’ ची ओळख.
  • स्वर आणि स्वरादीतील फरक (स्वर अ ते औ. अं आणि अ: हे स्वरादी आहेत).
  • अनुस्वार आणि विसर्ग ओळख (अं – अ वर असलेलं टिंब हा अनुस्वार आहे. तर अ: – : याल विसर्ग म्हणतात).