१२ नोव्हेंबर २०१७

मला कोण व्हायचं आहे यावर बोलणे. कोण, का, कसं, शक्य, अशक्य हे मुद्दे त्यात आवश्यक.
फळ्यावरील शब्दांवरुन गोष्ट तयार करुन सांगणे.
माझ्या किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टीला शेवट सुचविणे.
शब्दाचं एकवचन, अनेकवचन सांगितलं की व्याकरणाचा नियम काय आहे ते सांगणे. जसं – घर – घरे, दार – दारे, पान – पाने…. हे ऐकलं की नियम काय असेल ते मुलांनी सांगायचं.
नियम – अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाचं अनेकवचन एकारान्त होते.